Homeशहर परिसरदिवा बदलतोय,येणाऱ्या काळात दिवा शहरात विकासाचे अनेक उपक्रम होणार- रमाकांत मढवी

दिवा बदलतोय,येणाऱ्या काळात दिवा शहरात विकासाचे अनेक उपक्रम होणार- रमाकांत मढवी

दिवा शहराची ओळख आता केवळ समस्याग्रस्त शहर म्हणून राहिली नाही, तर विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारे शहर म्हणून होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहरात मूलभूत सुविधांची निर्मिती होत आहे.

आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा दिवा-आगासन मुख्य रस्त्यावर उभा करण्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे केवळ एका पुतळ्याचे बांधकाम नाही, तर दिवावासीयांच्या अस्मितेचा आणि शिवसैनिकांच्या स्वप्नांचा सन्मान आहे.
भविष्यात दिवा शहर अनेक आधुनिक सुविधांनी जोडले जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाने शहराला जोडल्यामुळे प्रवासाची समस्या कमी होईल. तसेच ऐरोली-काटई मार्गामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईला जलद आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल.
रेल्वे आणि रस्ते सुधारणा:
दिवा स्टेशनवरील वाढता भार कमी करण्यासाठी दातिवली स्टेशनचा विस्तार करण्याची योजना आम्ही आखली आहे. बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या दातिवलीहून सोडल्यास दिवा स्टेशनवरील गर्दी कमी होईल. दोन्ही स्थानकांचा समान विकास केल्यास नागरिकांना मोठा फायदा होईल.
दिवा-शील रोडचे कॉंक्रिटीकरण हे दिवा शहरासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. २४ मीटर रुंदीचा हा रस्ता योग्य नियोजनाने आणि डिव्हायडरमुळे वाहतूक कोंडीची समस्या संपवेल.
आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सोयीसुविधा:
नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी महापालिकेने दहा दवाखाने सुरू केले आहेत, जिथे ओपीडीमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद होते. यासोबतच तीन ‘डे केअर’ आरोग्य केंद्रेही सुरू आहेत. जागेअभावी आणि तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या रुग्णालयाचे काम रखडले असले तरी, उत्तम दर्जाचे हॉस्पिटल सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या साठवण टाक्या बांधण्याचे नियोजन आहे, ज्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. दिवा-शील रोडवरील पाईपलाईनचे कामही ९५ टक्के पूर्ण झाले आहे, अडथळे दूर होताच उर्वरित काम पूर्ण केले जाईल. सार्वजनिक हिताच्या कामांना विरोध न करण्याचे आवाहन मी करतो.
भविष्यातील दिवा:
नव्या विकास आराखड्यामुळे सार्वजनिक सुविधांसाठी भूखंड उपलब्ध होणार आहेत. आम्ही नागरिकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणार आहोत. उत्तम दर्जाचे उद्यान, तरण तलाव, वाचनालय, अभ्यासिका आणि सभागृह दिवा शहरात लवकरच उभारले जातील. तसेच स्वतंत्र पोलीस स्टेशनचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण होईल.
गेल्या सात-आठ वर्षांत दिवा शहरात जो बदल होत आहे तो तुम्ही नाकारू शकत नाही. टीका करणाऱ्यांनीही हे लक्षात घ्यावे की, इतक्या कमी वेळात वेगाने वाढणाऱ्या शहराला सुविधा पुरवणे हे अवघड काम आहे, पण प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही ते साध्य करत आहोत. दिवा शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
“जुना विकास आराखडा रद्द होऊन नवा विकास आराखडा लागू झाल्याने दिवा शहरात नागरिकांच्या सुविधेसाठी भूखंड उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जागा उपलब्ध होतील आणि त्या दृष्टिकोनातून येथील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देता येतील हा माझा शब्द आहे.
तुम्ही जर पाहिलं तर मागील सात-आठ वर्षात दिवा शहराचा कायापालट होत आहे. तुम्ही आमच्यावर टीका करू शकता परंतु होणारा बदल तुम्हाला नाकारता येणार नाही. इतक्या कमी अवधीमध्ये जलद गतीने वाढ होणारे दिवा शहर आणि त्याला उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा याचा तालमेल बसवणे हे अवघड असतानाही प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही दिवा शहराला चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत!
रमाकांत मढवी, शहर प्रमुख शिवसेना दिवा शहर
error: Content is protected !!