Homeठाणे-मेट्रोदिवा-मुंब्रा-ठाण्यात आणखी ६८ आपला दवाखान्याची होणार निर्मिती!

दिवा-मुंब्रा-ठाण्यात आणखी ६८ आपला दवाखान्याची होणार निर्मिती!

दिव्यातील दातीवली,साबे,खिडकाली,दिवा येथे होणार नवे दवाखाने

ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाण्यातही आपला दवाखाना महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ४५ ठिकाणी सध्यास्थित सुरु आहेत. त्यातच राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी ठाण्यात एक ‘आपला दवाखाना’ सुरू केला तसेच आणखी ६७ आपला दवाखान्याची निर्मिती होणार आहे. त्यातील २२ जागा दिवा, मुंब्रा आणि कळव्यात या सारख्या प्रभाग समिती अंर्तगत जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.
ठाण्यातील झोपडपट्टी परिसरात नागरीकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाण्यातही सध्या ४५ ठिकाणी आपला दवाखाना महापालिकेच्या माध्यमातून सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान सुरु आहेत. याठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार, ईसीजी, रक्त तपासणी, औषधे आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आता आपला दवाखाना ही संकल्पना सुरु केली आहे. त्यानुसार ठाण्यातही काही महिन्यांपूर्वी रामनगर भागात आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. दुपारी दोन ते रात्री १० वाजेपर्यंत हा दवाखाना सुरु असतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ह्या आहेत निश्चित झालेल्या २२ जागा
वागळे इस्टेट, सावरकरनगर, ढोकाळी, मानपाडा, दिवा, खिडकाळी, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हाजुरी, गांधी नगर, येऊर, बामनोई पाडा, कळवा आदी ठिकाणे निश्चित झाली आहेत.

error: Content is protected !!