दिवा:- दिवा विकास प्रतिष्ठान मार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने शिवजन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावली. दिवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी नगरसेवक व शिवसेना दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक अमर पाटील, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, उपविभाग प्रमुख समीर पाटील यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.