दिवा शहर हे एक वेगाने वाढणारे आहे, पण या शहराच्या विकासाची गती अजूनही अपुरी आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मी आणि माझे पती रोशन भगत दोघेही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहोत आणि दिवा शहराला एक आदर्श बनविण्याचे बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. दिवा शहरातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असतात. या समस्यांवर वेळोवेळी पाठपुरावा करून उपाययोजना करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो.
दिवा शहरातील समस्या आणि उपाय
मूलभूत सुविधांची कमतरता: दिवा शहरात वाढत्या लोकसंख्येला पुरेशी चांगले रस्ते, आरोग्यसेवा आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. शहराच्या विकासासाठी तातडीने या सुविधा पुरवणे आवश्यक आहे. दिवा शहरात पोलीस चौकी आहे मात्र त्या ठिकाणी महिला कॉन्स्टेबल नव्हत्या. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा करून दिवा शहरात महिला कॉन्स्टेबल आता कार्यरत आहे. दिवा शहरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे रस्त्यावर स्पीड बेकर लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे महिलांच्या समस्यांचा पाठपुरावा करणे त्याचबरोबर मतदार नोंदणी पासून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना सहकार्य करणे अशी कामे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करतच असतो.
प्रशासकीय निष्क्रियता: दिवा शहराच्या विकासासाठी अनेक योजना तयार झाल्या आहेत, पण त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. प्रशासकीय उदासीनता आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे अनेक प्रकल्प कागदावरच राहतात.
दिवा शहरातील कामांमध्ये अनेकदा राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे विकासाची गती मंदावते. चांगले नियोजन आणि कामाच्या योग्य अंमलबजावणीसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
मतदार नोंदणी आणि जागृती: अनेक तरुण आणि नवमतदार अजूनही मतदार म्हणून नोंदणीकृत नाहीत, त्यामुळे त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. मतदार नोंदणी वाढवून राजकीय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे महत्त्वाचे आहे.
मी आणि माझे पती रोशन भगत, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिवा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून कामाचा दर्जा सिद्ध करतो. आमच्यासाठी दिवा शहराचा विकास हेच उद्दिष्ट आहे.
येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये दिवा शहराला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकांना फक्त आश्वासने देऊन आणि त्यांना गृहीत धरून चालणार नाही, तर त्यांचे प्रश्न समजून घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.
मी दिवा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करते की, आपल्या शहराच्या विकासासाठी योग्य नेतृत्वाला साथ द्या. तुमच्या एका मतावर शहराचे भविष्य अवलंबून आहे. दिवा शहराला एक सुंदर आणि आदर्श शहर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. दिवा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊया असे मी सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करते!
– सौ. सपना रोशन भगत,
महिला अध्यक्षा,भारतीय जनता पार्टी,दिवा शीळ मंडळ