Homeशहर परिसरदिवा शहरात कजरी महोत्सवाचे आयोजन, भाजप आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती

दिवा शहरात कजरी महोत्सवाचे आयोजन, भाजप आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती

दिवा:-भारतीय जनता पार्टी दिवा शहर आणि उत्तर भारतीय मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा विभागात ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजनजी डावखरे आणि ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात दिवा विभागात कजरी महोत्सवचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटक आमदार संजय केळकर आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री व डोंबिवली शहराचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित होते, तसेच शिवाजी आव्हाड साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष हर्षलाताई बुबेरा, बिंद्रा फाउंडेशनच्या अध्यक्षा ऍड. बिंदू दुबे,दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, ठाणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत, कार्यकारणी सदस्य विजय भोईर, अशोक पाटील, गणेश भगत ,ठाणे शहर उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष शैलेश मिश्रा, मंडल संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील, सीमा भगत, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत,व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, डॉक्टर सेल आघाडी विद्यासागर दुबे, मधुकर पाटील, प्रवीण पाटील, अंकुश मढवी, वार्ड अध्यक्ष नागेश पवार,राहुल साहू, अमरनाथ गुप्ता, जिलाजीत तिवारी, रमेश यादव,अवधराज राजभर, वीरेंद्र गुप्ता, प्रशांत आंबोणकर ,शीला गुप्ता, सुनिता प्रजापती, गौरी शंकर पटवा आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!