दिवा:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल सायंकाळी दिवा शहरात म्हात्रे गेट येथे पेढे वाटून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्रासमोरील संकटांना सामोरे जात, महाराष्ट्र धर्मासाठी जिद्दीने लढणारे उद्धव साहेब यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी यावेळी उपस्थितांनी देवाला साकडे घातले.
हा कार्यक्रम शिवसेना विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, शनिदास पाटील, तसेच विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटिका सौ. ज्योती राजकांत पाटील यांनी केले होते. महाराष्ट्रावरील विविध समस्या रुपी संकट दूर करण्यासाठी उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभो, अशी भावना यावेळी ज्योती पाटील यांनी व्यक्त केली.