दिवा:- दिवा शहरातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक सक्रिय कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर व ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अनभोरे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी अमोल प्रकाश जाधव, रोहित मदन बागुल, अक्षय म्हस्के, राहुल कांबळे, मुकेश शर्मा, सुयश शिंदे, दोडके करोटिया व सुचिता जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महासचिव मा. मोहन नाईक, मा. विकास इंगळे (कल्याण ग्रामीण), मिलिंद गवई (दिवा विभाग प्रमुख), सौ. गाथा विकास इंगळे (दिवा विभाग उपाध्यक्षा) यांच्यासह प्रह्लाद महसके, संदीप खरात, संभाजीराव वानखडे, राजू दावरे, रवि कांबळे, गौतम महसके, रुपेश कांबळे, देवेंद्र कांबळे, गणेश पवार, अरविंद कदम व पंडगाले आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामुळे दिवा शहरातील वंचित बहुजन आघाडी अधिक संघटित व मजबूत होणार असून आगामी स्थानिक राजकारणात पक्षाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे






