Homeठाणे-मेट्रोदिवा शहर नागरी हक्क समितीचा इशारा – दिवा रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदेशीर...

दिवा शहर नागरी हक्क समितीचा इशारा – दिवा रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करा

दिवा:- दिवा शहर नागरी हक्क समितीच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीकडे दिवा रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्ते अडवून बसत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असून आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका तसेच सार्वजनिक वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक प्रशासनाकडे “No Hawking Zone” घोषित करण्याचा अधिकार असतानाही दिवा रेल्वे स्थानक व परिसरात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून नियमांचे उघड उल्लंघन सुरू आहे.

समितीने प्रशासनाला मागणी केली आहे की:

* दिवा रेल्वे स्थानक परिसर तात्काळ “No Hawking Zone” घोषित करावा
* सर्व बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी
* भविष्यात अशा अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे
* नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात

जर प्रशासनाने याकडे दुर्लक्षया केले, तर दिवा शहर नागरी हक्क समिती नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिवा-शीळ नागरी हक्क समितीने दिला आहे. यावेळी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शिव प्रसाद नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले यावेळी समितीचे हिरा पाटील, ॲड.रोहिदास मुंडे, सचिन पाटील, विजय भोईर,तुषार पाटील,रोशन भगत,दिलीप भोईर,प्रकाश पाटील आदी उपस्थित होते

error: Content is protected !!