दिवा:– दिवा शिवसेनेच्या माध्यमातून गणेश भक्तांसाठी कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे शहरातील गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सव निमित्त दिवा शहरातून गणेश भक्तांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने माणगाव,महाड-पोलादपूर,खेड,मंडणगड- दापोली,गुहागर,चिपळूण,संगमेश्वर, रत्नागिरी-लांजा,राजापूर,खारेपाटण-तळेरे वैभववाडी,कणकवली,कुडाळ,मालवण कसालमार्गे,सातारा (पाटण, पवनगाव ),कराड-सांगली,कोल्हापूर(आजरा,शाहूवाडी, कोवाड) येथील नागरिकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
बुकिंगसाठी जवळच्या शिवसेना शाखेमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन दिवा शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सर्व बस १७ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.






