Homeठाणे-मेट्रोदिवा-शीळ रस्त्याला पदपथ दिवे लावा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

दिवा-शीळ रस्त्याला पदपथ दिवे लावा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

दिवा:-दिवा – शिळ मुख्य रस्त्याला पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केली आहे.

दिवा शहरातील दिवा – शिळ मुख्य रस्त्यावरील जिव्हाळा हॉल ते खर्डी गाव ब्रीज पर्यंत मुख्य रस्त्याला पथदिवे बसवलेले नाहीत. त्यामुळे रात्री येथे खूपच अंधार असतो. नागरिकांना खास करून महिला वर्गाला गाडीने प्रवास करणे सुरक्षित वाटत नाही तसेच साई नगर, टाटा पॉवर येथील रहिवाशी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अंधारातून घरी चालत जाव लागत.याआधी इथे अनेक गुन्हे घडले आहेत परिणामी नागरिकांच्या सुविधेसाठी तातडीने पदपथ दिवे लावण्यात यावेत अशी मागणी शहरप्रमुख सचिन पाटील यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. मागणीची दाखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

error: Content is protected !!