Homeशहर परिसरदिवा स्टेशन परिसर तलावातील कचरा व गाळ तातडीने साफ करा-शैलेश पाटील

दिवा स्टेशन परिसर तलावातील कचरा व गाळ तातडीने साफ करा-शैलेश पाटील

दिवा:-दिवा स्टेशन परिसरातील तलावाची स्वच्छता व साफसफाई होत नसल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक व उप शहरप्रमुख शैलेश पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तलावातील गाळ व कचरा तातडीने साफ करण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

दिवा पूर्वेला स्टेशन लगत असणारे तलाव पूर्णतः कचऱ्याने भरले असून या तलावातील कचरा अद्याप महापालिकेमार्फत साफ करण्यात आलेला नाही. पालिका अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने शैलेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तलावाच्या स्वच्छतेकडे ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीतील अधिकारी लक्ष देत नसल्याने या तलावात घाणीचे साम्राज्य वाढले असून संपूर्ण तलावात कचरा साचला आहे. त्याचबरोबर या तलावातील गाळ साफ करण्यात यावा अशी ही मागणी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी केली आहे.

error: Content is protected !!