Homeकोकण-महाराष्ट्रदिवा स्थानकात प्रवाशांचा संताप,प्रवासी ट्रॅकवर उतरले! मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल रोखली

दिवा स्थानकात प्रवाशांचा संताप,प्रवासी ट्रॅकवर उतरले! मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल रोखली

दिवा- दिवा रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा प्रवाशांचा संताप पहायला मिळाला.कामाच्या वेळेस बुधवारी सकाळीच लोकल मध्ये चढण्यास न मिळाल्याने प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून संताप व्यक्त केला.

बुधवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानक येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने ट्रॅक बदलल्यामुळे त्याचा फटका दिव्यातील प्रवाशांना बसला. त्यामुळे १० मिनिटांहून अधिक काळ दिवा स्थानकात प्रवाशांनी लोकल रोखून धरली. अखेर प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर लोकल सेवा सुरळीत सुरू झाली. सकाळच्या वेळेस दिव्यातील प्रवासी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ऊभे असताना रोज मुंबईच्या दिशेने जाणारी फलाट क्रमांक ४ वरील लोकल थोड्या उशिराने दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली. ४ वर येणारी लोकल ट्रेन २ वर आल्याने प्रवाशांची मोठी धांदळ उडाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली. ट्रेन समोर ऊभे राहत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच ही लोकल तब्बल १० ते १५ मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. रेल्वे स्थानकात गोंधळ झाल्यानंतर आरपीएफ जवानांसह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर प्रवाशी रेल्वे रुळांवरुन बाजूला झाले.

error: Content is protected !!