Homeठाणे-मेट्रोदिव्यातील टाटा पावर रोडची दुरावस्था, रस्ता दुरुस्त करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी

दिव्यातील टाटा पावर रोडची दुरावस्था, रस्ता दुरुस्त करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी

दिवा:- बी.आर नगर भागातील टाटा पावर रोड हा दातिवली आगासन कडे जाणाऱ्या नागरिकांना शीळ फाट्याकडून कडून येताना जवळचा रस्ता आहे.मात्र खड्डे,चिखलामुळे या रस्त्याची वाताहत झाली असून पालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशाखाप्रमुख विलास उतेकर यांनी केली आहे.

मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या मार्गाने अनेक वाहने ये जा करतात.परंतु या रस्त्यावर खड्डे, चिखलाचे साम्राज्य असून वाहनांना व स्थानिक लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.बहुतांश कामगार वर्ग या रस्त्यावरून ये जा करत असतात.आधिच हा रस्ता खराब असल्याने लोकांना व वाहनांना या रत्यावरुन ये जा करण्यास अडचण होत होती.लोक व वाहने या रस्त्याने कशी जाणार? असा सवालही उतेकर यांनी विचारला आहे.

error: Content is protected !!