Homeशहर परिसरदिव्यातील नालेसफाईत झोल; कंत्राटदाराला काळया यादीत टाकून, कामाची बिले थांबवा,मनसेची मागणी

दिव्यातील नालेसफाईत झोल; कंत्राटदाराला काळया यादीत टाकून, कामाची बिले थांबवा,मनसेची मागणी

दिवा:-ठाणे महानगर पालिका कार्यक्षेत्रातील नाल्यांची सफाई ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार दिवा शहरातील नालेसफाईची कामे ही विहित मुदतीत करणे कंत्राटदाराकडून अपेक्षित होते. पण आज जून महिन्याची १० तारीख उलटल्यानंतरही दिवा शहरातील नाल्यांची आणि गटारांची परिस्थिती जैसे थे आहे. परिणामी सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका व त्याची बिले थांबवा अशी मागणी दिवा मनसेने केली आहे.

दिव्यातील गटारांच्या आणि नाल्यांच्या सफाईसाठी दिवा प्रभाग समिती मधील स्वच्छता विभागाकडे संपर्क केल्यानंतर तिथून संबंधित कंत्राटदाराच्या प्रतिनिधीशी संपर्क सांगण्यात आले. कंत्राटदाराचा प्रतिनिधी
सुंदर पेरुमल याच्याशी संपर्क करून १७ मे रोजी साफसफाई न झालेल्या सर्व गटारांची माहिती देण्यात आली. सदर ठेकेदाराशी ३ – ४ वेळा वेळ पाठपुरावा करूनही अद्याप त्या परिसरामध्ये कुठलीही नालेसफाई हाती घेण्यात आलेली नाही. अशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

यामुळे पावसात नागरिकांच्या घरात गटाराचे पाणी जमा होत आहे. या सर्व परिस्थितीला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. काम न करता महापालिकेचा पर्यायाने नागरिकांचा कर रुपातील पैसा लुबडण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न दिसून येत आहे. या कामात दिवा प्रभाग समिती मधील काही महापालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग ही नाकारता येत नाहीये अशी शंका मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी व्यक्त केली आहे. कारण ज्या प्रकारे या सर्व कामावर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची देखरेख असायला हवी आहे, ती दिसून येत नाही.

त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट तातडीने रद्द करून त्याला काळया यादीत टाकावे. तसेच त्याने केलेल्या कामांची विभागीय चौकशी करण्यात यावी आणि ही चौकशी पूर्ण होई पर्यंत संबंधित कंत्राटदाराच्या बिलाची रक्कम अदा न करता ती रोखून धरावी. अशी मागणी दिवा मनसेकडून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!