दिवा: – रस्ता ओलांडत असताना ट्रकखाली आल्याने दिपक हेमले या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिव्यातील बेडेकर नगर ते घडली.
दिपक हेमले हे एका डोळ्याने अंध होते. त्यामुळे रस्ता ओलांडताना दृष्टीअभावी त्यांना ट्रकची चाहूल न लागल्याने हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दिपक हेमले यांच्या पश्चात त्यांची पत्नी आशा हेमले, दोन मुले – ओंकार आणि प्रणव हेमले, सून माधुरी हेमले व दोन नातवंडे असा परिवार आहे. अपघातानंतर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.






