दिवा:-दिवा पूर्वेला साबे गावात जाणारा रस्ता खराब झाला असून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच मुंब्रादेवी कॉलनी ट्रान्सफॉर्मर जवळ साचलेले गटाराचे पाणी साफ करावे अशी मागणी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी ठाणे महापालिकेकडे केली आहे.
दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात वरील मागण्या अमोल केंद्रे यांनी केल्या आहेत.गणेशोत्सव सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन कराव्या लागणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात असे अमोल केंद्रे यांनी या पत्रात म्हटले आहे.मुंब्रा देवी कॉलनी येथे ट्रान्सफॉर्मर जवळ गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्याने दुर्गंधी पसरत असल्याचे अमोल केंद्रे यांनी म्हटले आहे.या दोन्ही समस्या पालिका प्रशासनाने तातडीने सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.