ठाणे :- दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यातच दिवा परिसरातील संतोष नगर येथील नाईक नगर चाळीमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने १३ रहिवासी त्या पाण्यात अडकलेले होते. त्यांची ठाणे महापालिकेच्या शीळ अग्निशमन दलाच्या जवानांनी मंगळवारी रात्री सुटका केली आहे. त्या रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत, त्यांची सुखरूप सुटका केली. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.