दिवा:- दिव्यात समर्थ नगर, मोरेश्वर प्लाझाच्या जवळ चार चाकी व्हॅगनार कारला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. पार्किंग मध्ये उभे असणाऱ्या कारला अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दर तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाने सदर आग आटोक्यात आणली.