Homeठाणे-मेट्रोदिव्यात खारफुटीची कत्तल करून डम्पिंग ग्राऊंडसाठी पर्यावरणाचा ऱ्हास, भाजपचे विजय भोईर यांचे...

दिव्यात खारफुटीची कत्तल करून डम्पिंग ग्राऊंडसाठी पर्यावरणाचा ऱ्हास, भाजपचे विजय भोईर यांचे मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन

ठाणे :- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात ठाणे भाजपचे सचिव विजय भोईर यांनी दिव्यातील खारफुटीची कत्तल व डम्पिंग ग्राउंड मुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हे दोन प्रमुख मुद्दे मांडले. या प्रश्नावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या अशी माहिती विजय भोईर यांनी दिली.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात दिव्यातील पर्यावरणाशी कशा प्रकारे खेळ सुरू आहे हे आपण निदर्शनास आणून दिल्याचे विजय भोईर यांनी याबाबत बोलताना सांगितले. खाड्या बुजवून अनधिकृतपणे सुरू असलेले डम्पिंग ग्राउंड, तसेच दिव्यातील खारफुटीची वारेमाप होणारी कत्तल याकडे विजय भोईर यांनी लक्ष वेधले. तसेच डम्पिंगच्या प्रदूषणामुळे दिव्यातील लोकांचे आरोग्य धोक्यात येत चालले आहे. हेही भोईर यांनी पंकजा मुंडे यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी पंकजा मुंडे यांनी सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन सदर विषयावर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात सूचना दिल्या असल्याची माहिती विजय भोईर यांनी दिली.

error: Content is protected !!