Homeशहर परिसरदिव्यात जाणता राजा मित्र मंडळांच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न

दिव्यात जाणता राजा मित्र मंडळांच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न

दिवा:-दिव्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जाणता राजा मित्र मंडळ मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.यावेळी सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित करण्यात आली होती.महाराजांच्या प्रतिमेच विधिवत पूजन करून शिवजयंती कार्यक्रमाला सुरवात झाली. दिवा शहरातील येणाऱ्या प्रत्येक शिवज्योत तसेच शोभायात्राचे स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. लहान मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम , सुमधुर भजन , मंगळागौर असे अनेक कार्यक्रम या दिवशी पार पडले.यावेळी मंडळाच्या माध्यमातून टाटा हॉस्पिटल बाहेर रुग्णाच्या नातेवाईकांना दररोज मोफत जेवण वाटप करणारे समाजसेवक श्री . जय होलमुखे यांचा विशेष सत्कार या वेळी मंडळाच्या वतीने करण्यात आला. त्याचबरोबर गेट वे ऑफ इंडिया ते गुवाहाटी असा 2750 किलोमिटर चा 26 दिवसांचा प्रवास साईकल वरून करणारी कू. कृतिका बिर्जे हीचा देखील सत्कार या वेळी करण्यात आला. रात्री नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष श्री. समीर चव्हाण यांनी सदर माहिती दिली. राजेंद्र आंब्रे , प्रशांत चव्हाण , उदय सावंत , विघ्नेश सुर्वे , सुशांत अर्धापुरे , जय आंब्रे , प्रशांत अर्धापूरे, महेंद्र आंब्रे, प्रतीक विचारे , अभिजीत सुर्वे , नारायण चव्हाण ,विकी कदम , अरविंद ढेकळे , रामचंद्र आंब्रे , रामापती पांडे , दीपक मोंडे , सुनील चव्हाण ,या प्रमुख पदाधिकारी तसेच विभागातील रहिवाशी , महिला वर्ग , जेष्ठ नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!