Homeठाणे-मेट्रोदिव्यात वाढते अपघात, भारतीय मराठा संघाचे पोलिसांना निवेदन

दिव्यात वाढते अपघात, भारतीय मराठा संघाचे पोलिसांना निवेदन

दिवा – शहरात वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मराठा संघाने दिवा प्रभाग समिती, मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे मनपा आयुक्त व ठाणे वाहतूक विभागास निवेदन दिले आहे.

दिवा शहरात दिवा रेल्वे स्टेशन परिसर ते दिवा- आगासन चौक येथे नियमित ट्रॅफिकची समस्या नागरिकांना भेडसावत असते. दुकानदारांचा व फेरीवाले यांचा पदपथावरील कब्जा यामुळे होणारे वारंवार अपघात. यामुळे सामान्य नागरीकांना जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागत आहे. नुकतेच दिनांक ०६/१०/२२ रोजी दिवा शिळ रोड वर असाच एक अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. मागील काही महिन्यात अशा कित्येक समस्या घडलेल्या आहेत. या समस्यांवर तातडीने उपाय व्हावा व अशा सगळ्या घटना लवकरात लवकर आटोक्यात याव्यात याकरिता भारतीय मराठा संघ आक्रमक झाला आहे. याप्रसंगी भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार, प्रदेश सचिव एस डी पाटील, उपाध्यक्ष दीपक पालांडे, ठाणे महानगर संपर्क प्रमुख अरुण फणसे, उद्योग आघाडी उपाध्यक्ष दिलीप लटके व दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

error: Content is protected !!