Homeठाणे-मेट्रोदोन महिन्यांत सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ..

दोन महिन्यांत सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ..

आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक..

ठाणे:- येत्या दोन महिन्यांत ठाणे महापलिकेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्याचा निर्णय आमदार संजय केळकर, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून अनेक सफाई कर्मचारी देखील वारसा हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार आमदार संजय केळकर यांनी महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी केळकर यांच्यासह मुख्यालय उपायुक्त गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप उपस्थित होते. या बैठकीत येत्या दोन महिन्यांत वारसा हक्काची सर्व प्रकरणे निकाली काढून सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्यात येईल, असे गोदेपुरे यांनी आ.केळकर यांना सांगितले.

अनुकंपा तत्वावर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसांत पुन्हा सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या विषयावरही बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीस महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष दत्ता घुगे, सरचिटणीस अजित मोरे, कोषाध्यक्ष सुधाकर शिंदे उपस्थित होते. उपस्थित कर्मचारी वर्गाने केळकर आणि महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!