ईव्हीएम मशीन चार वेळा सुरू का केली? सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी टाळाटाळ का?
शिवसेना नेते राजन विचारे यांचा सवाल
ठाणे :- ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानसभा उमेदवार राजन विचारे व केदार दिघे यांच्या काल ईव्हीएम च्या तपासणी आणि पडताळणी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये समाधानकारक प्रक्रिया पार पडली असे सांगण्यात आले आहे. परंतु हा दावा साफ खोटा आहे, कारण निवडणूक आयोगाने नव्याने बनवण्यात sop नुसार ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या Burnt memory / microcontroller च्या तपासणी व पडताळणी टेक्निकल प्रक्रिया न समजल्याने कार्यपद्धती कशी असणार याची सादरीकरण तथा माहिती उमेदवार प्रतिनिधींना न दिल्याने दोन दिवसापूर्वी कार्यपद्धतीची लेखी माहिती द्यावी अशी पत्राद्वारे मागणी ही करण्यात आली होती. परंतु ही माहिती अखेर पर्यंत दिली नाही. या प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास मॉक पोल घेऊन मशीन मधील डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया sop मध्ये करण्यात आली होती. यामुळे केंद्रीय वखार महामंडळ तुर्भे नवी मुंबई येथे दिनांक 19 जुलै 2025 रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या तपासणी व पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी सकाळी उपस्थित राहून मतदान केंद्रावरील ईव्हीएम मधील डेटा डिलीट होऊ नये या भीतीने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार Diagnostic checking हा पर्याय निवडून ANNEXURE-1 अर्ज भरून दिला. व या प्रक्रियेमध्ये कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवून मशीन बंद केल्या तसेच या प्रक्रिया पार पडत असताना 148 ठाणे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक 68 वरील VVPAT मशीन मध्ये बॅटरी मिळाली त्याचबरोबर ईव्हीएम मशीन या 1 सिम्बॉल लोडिंग/२ मतदानाच्या दिवशी मॉक पोल/३ मतदानाला सुरुवात करताना अशी तीन वेळा सुरू असावी लागते परंतु ही मशीन चार वेळा सुरू झाल्याचे निदर्शनास आले त्यावेळी उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यास भाग पाडले व त्यानंतर ही ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये का ? मतदान केंद्रावर चौथ्यावेळी सुरू करण्यात आली होती याची सीसी फुटेज व कागदपत्रे देण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.