Homeकोकण-महाराष्ट्रपत्रकार प्रशांत सिनकर यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

पत्रकार प्रशांत सिनकर यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

ठाणे: पत्रकारितेमध्ये विशेष कार्य केल्याबद्दल दिला जाणारा अप्रतिम मीडिया, पुणे यांचा ‘चौथा स्तंभ’ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक तसेच ठाण्यातील ज्येष्ठपत्रकार प्रशांत सिनकर यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नरिमन पॉइंट येथील यशवंराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, अभिनेते मंगेश देसाई, अप्रतिम मिडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!