पश्चिम बंगाल येथील भारत सरकारशी सलग्न काम करणाऱ्या नव्या फाऊंडेशनचा पुरस्कार
ठाणे :पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना पश्चिम बंगाल येथील नव्या फाऊंडेशन यांच्या वतीने दिला दिला जाणारा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान २०२३ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारशी सलग्न नव्या फाऊंडेशन ही संस्था काम करत असून, लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
पत्रकारिता करत असताना पर्यावरण संवर्धनासाठी बहुमूल्य योगदान देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रशांत सिनकर यांना राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती नव्या फाऊंडेशनचे प्रमुख सल्लागार निरंजन गुप्ता यांनी दिली. या अगोदर प्रशांत सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा शि.म.परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको-२०१३ पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन ठाणे गौरव अशा विविध पुरस्कारांनी गौरवलं आहे.