ठाणे : शालांत परीक्षा मार्च २०२४ मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार यांच्यासह विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
संस्कृत भाषेसाठी ऋजुला पाटील – गुण-१०० (ए.के.जोशी इंग्लीश मिडीयम स्कूल, ठाणे), इंग्रजी भाषेसाठी सृष्टी पाटील गुण – ९८ ( श्रीरंग विद्यालय), मराठी भाषेसाठी श्रियांश गावकर – गुण ९९ (सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूल), गुजराती भाषेसाठी राठोड कशिश अमितभाई – गुण ८३, (शेठ टी.जे. हायस्कूल, ठाणे) हिंदी भाषेसाठी साहिल बाबू शाह -गुण ९५ (वेद हिंदी हायस्कूल) उर्दु भाषेसाठी कु. अन्सारी शिफा अमिरउल हसन -गुण ९४ (शोएब उर्दु हायस्कूल) या विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दोन हजार रुपयांचा धनादेश, सन्माचिन्ह व ग्रंथबुके देवून गौरविण्यात आले.






