मनसे आमदार राजू पाटील व शिवसेनेचे माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत दौरा
दिवा:– दिवा शहरात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांचा पाहणी दौरा पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील व दिवा शिवसेनेचे माजी नगरसेवक उपस्थित होते.
शहरातील अनेक विकास काम रखडलेली असून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी या दौऱ्या दिल्या.दिवा पूर्व व दिवा पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर दिवा पश्चिमेतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मंजूर असलेली पुशिंग पद्धतीची पाण्याची लाईन टाकण्याचं काम सुरू करावे, दिवा स्टेशन ते एन.आर. नगर रस्ता तसेच दिवा स्टेशन पूर्व ते दातिवली स्मशानभूमी रस्ता, रिलायन्स टॉवर रस्ता तसेच पाण्याचा रिमोल्डिंग प्रकल्प, मंजूर दिवा-शिळ पाईप लाईन काम व पाण्याच्या टाक्यांची कामे इत्यादी अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्पांवर आजच्या या दौऱ्यात चर्चा करण्यात आली.दौऱ्या दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करून ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत अशी सूचना आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील,माजी उपमहापौर रमाकांत मढवी,माजी नगरसेवक शैलेश पाटील,अमर पाटील,आदेश भगत,तुषार पाटील,उमेश भगत,दीपक जाधव,निलेश पाटील,प्रशांत गावडे,भालचंद्र भगत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.