दिवा : दिवा शहरातील साबे गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, काही घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसाने स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेचे विभागप्रमुख निलेश पाटील व अर्चना पाटील यांनी तात्काळ पाणी साचलेल्या पूरग्रस्त भागांचा दौरा करून नागरिकांची भेट घेतली. त्यांनी स्थानिक गरजूंसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करून एक सकारात्मक पाऊल उचलले. या मदतीमुळे पावसामुळे अडकलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला.
या मदतकार्यात शिवसैनिक व राजे प्रतिष्ठान, साबे यांनीही मोलाचे सहकार्य केले. नागरिकांना अन्न, पाणी व इतर गरजेच्या वस्तू वेळेवर उपलब्ध करून देण्यात आल्या.
अशा कठीण प्रसंगी धावून आलेल्या निलेश पाटील व अर्चना पाटील यांचे स्थानिक नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले.