Homeठाणे-मेट्रोपुन्हा सिपी तलाव डम्पिंगवर कचरा पेटला ; दोन तासांनी आगीवर नियंत्रण

पुन्हा सिपी तलाव डम्पिंगवर कचरा पेटला ; दोन तासांनी आगीवर नियंत्रण

ठाणे:- पुन्हा एकदा वागळे इस्टेट येथील सिपी तलाव डम्पिंगवरील कचरा पेटल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. त्या आगीवर दोन तासात नियंत्रण मिळविण्यात ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. हे डम्पिंग वागळे बस डेपो बाजूला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली होती. यावेळी ०१- फायर वाहन, ०१- रेस्क्यू वाहन आणि ०१- जम्बो वॉटर टँकर पाचारण करण्यात आले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!