Homeठाणे-मेट्रोपोलचा तुटून लटकणारा लोखंडी भागाचा धोका टळला

पोलचा तुटून लटकणारा लोखंडी भागाचा धोका टळला

ठाणे: सिव्हिल हॉस्पिटल समोर महावितरणच्या जुन्या वापरात नसलेल्या पोलचा लोखंडी भाग तुटून लटकत असल्याचा प्रकार बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समोर आला. सुदैवाने वेळी ही बाब लक्षात आल्यानंतर निर्माण झालेला धोका दूर करण्यातही यश आले. शिवाय मोठे अनर्थ टळले.
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल समोर महावितरणच्या जुन्या वापरात नसलेल्या पोलचा लोखंडी भाग तुटून लटकत असल्याची माहिती महेश नामक इसमाने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, महावितरण, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. तसेच हायड्रॉलिक लिफ्टर वाहनाच्या मदतीने तो धोकादायक भाग काढून बाजूला केला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!