Homeठाणे-मेट्रोपोलीस उपनिरीक्षक महादेव काळे राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

पोलीस उपनिरीक्षक महादेव काळे राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

ठाणे : ठाणे पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या उपनिरीक्षक महादेव काळे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. साकेतयेथील पोलीस मैदानावर देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले.
पोलीस दलातील ३७ वर्षांच्या सेवेत महादेव काळे यांनी आतापर्यंत घरफोडी. जबरी दरोडे,खून, खुनाचे प्रयत्न, महिला आणि अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारांचा कुशलतेने तपास करत आरोपीना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ मध्ये असताना काळे यांनी २००० साली घातपात करण्यासाठी विविध शस्त्रांसह लपून बसलेल्या हिजबुल संघटनेच्या ४ अतिरेक्यांना शिताफीने शास्त्रात्रांसह अटक करून मोठे संकट टाळण्याची महत्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीसाठी महादेव काळे आणि त्यांच्या पथकाला तत्कालीन गृह आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बक्षीस पत्र देऊन गौरवले होते. महादेव काळे यांनी आपल्या सेवेत चार खून आणि ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रशंसनीय कामगिरीकरता महादेव काळे यांना मे २०१४ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गौरवचिन्ह प्रदान केले होते.
घरी पोलीस दलातील सेवेची पार्श्वभूमी असलेल्या महादेव काळे यांनी वडील गोविंद काळे यांच्याप्रमाणे १९८८ साली ठाणे पोलीस दलात प्रवेश केला. आपल्या पोलीस दलातील सेवेच्या काळात ठाण्यातील विविध पोलीस स्थानकामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. पोलीस दलात आतापर्यंत निष्कलक सेवा देणाऱ्या महादेव काळे यांनी प्रापंचिक जबाबदारीहि व्यवस्थित पार पाडली आहे. त्यात त्यांच्या पत्नी सीमा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. त्यांची कन्या अश्विनी एमबीबीएस डॉकटर असून दसरी कन्या आयुषीने एम एस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

error: Content is protected !!