ठाणे :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ठाणे जिल्हा शाखेचा मेळावा रविवार १६ फेब्रुवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे सभागृह शहापूर येथे राज्य शिक्षक नेते उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. यावेळी ठाणे जिल्हा शाखेची पुनर्रचना करून नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष पदी विनोद लुटे तर, सरचिटणीस गुरुनाथ पवार, कार्याध्यक्ष संदीप भोईर, कोषाध्यक्ष संतोष जाधव यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. जिल्हा संघटक गणेश बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुरेश जाधव, परशुराम घाणेकर, संतोष जाधव,तर कार्यालयीन चिटणीस अर्जुन बांबेरे, सहसचिव विजय गायकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी सुनील जाधव व शहापूर, भिवंडी तालुका नूतन कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली. शहापूर तालुका नेते पदी पुरुषोत्तम ठाकरे,तालुका अध्यक्षपदी योगेश रोठे, सरचिटणीस तुषार सापळे, भिवंडी तालुकाध्यक्ष जगदीश झिंजाळ, महिला उपाध्यक्षपदी गीतांजली बाविस्कर यांची निवड जाहीर करण्यात आली.