दिवा:-बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिवा शहरात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिवा शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून व हाताला काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध नोंदवला.त्याचबरोबर सरकारच्या भूमिकेचा निषेधही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. दिवा स्टेशन परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण ग्रामीण विधानसभा महिला संघटिका योगिता नाईक, शहरप्रमुख सचिन पाटील,दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील,युवा सेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






