दिवा:-बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद बुधवारी दिव्यात उमटले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला आघाडी तर्फे महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.
महिला अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी ठरले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाने केली. या आंदोलनात माजी आमदार सुभाष भोईर, महिला संपर्कप्रमुख मृणाल यज्ञेश्वरी,महिला संघटीका ज्योती पाटील, शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, माजी नगरसेविका अंकिता पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक,शहर समन्वयक प्रियंका सावंत, उपशहर संघटक प्रवीण उतेकर व शिवसैनिक विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, दिव्यातील महिला- माता भगिनी या आंदोलनात सहभागी झाले होते.






