Homeठाणे-मेट्रोबनावट फेसबुक अकाउंट द्वारे शैलेश पाटील यांची बदनामी, आक्रमक कार्यकर्त्यांचा दिवा पोलीस...

बनावट फेसबुक अकाउंट द्वारे शैलेश पाटील यांची बदनामी, आक्रमक कार्यकर्त्यांचा दिवा पोलीस चौकीला घेराव!

दिवा:-दिव्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख माजी नगरसेवक शैलेश पाटील यांची फेसबुकवर बनावट अकाउंट काढून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी शैलेश पाटील यांच्या समर्थकांनी सोमवारी दिवा पोलीस चौकीला घेराव घातला. यावेळी पोलिसांनी बनावट अकाउंट चालवणाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले.

मागील काही दिवसांपासून हिशोब दहा वर्षाचा या बनावट फेसबुक अकाउंट वरून शैलेश पाटील यांचे राजकीय विरोधक जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करत आहेत.दिवा शहरात आठ नगरसेवक मागील पाच वर्षे होते. तसेच आमदार,खासदार असे दिवा शहराचे इतर लोकप्रतिनिधी देखील काम पाहत असताना शैलेश पाटील यांनाच दिव्यातील समस्यांना जबाबदार धरून एकतर्फी टार्गेट करणाऱ्याचा हेतू समोर येणे आवश्यक आहे असे शैलेश पाटील यांच्या समर्थकांचे मत आहे. बदनामी करणाऱ्या बोगस फेसबुक अकाउंट वर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शैलेश पाटील यांच्या समर्थकांनी केली. दिव्यात शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आलेले असताना याशिवाय दिव्यात शिवसेनेचे माजी उपमहापौर राहिले असताना आठपैकी अन्य कुणालाच दिव्यातील समस्यांना जबाबदार धरले जात नाही,फक्त शैलेश पाटील यांनाच टार्गेट केले जात असल्याने शैलेश पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनीही नेमका विकास झाला आहे की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता शैलेश पाटील यांचे समर्थक करत आहेत.जर दिव्यात विकास झाला नाही असे बनावट अकाउंट काढणाऱ्या व्यक्तीचे म्हणणं असेल तर त्याला सर्व नगरसेवकांना जबाबदार धरायला हवे होते, मात्र फक्त शैलेश पाटील यांच्यावर टीका केल्याने हा प्रकार कोणी जाणीवपूर्वक करताय का?शैलेश पाटील यांची प्रतिमा ममलिन करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा संशय शैलेश पाटील यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. शैलेश पाटील यांची बदनामी करणारी व्यक्ती शोधून काढली नाही तर दिव्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शैलेश पाटील यांच्या समर्थकाने दिला आहे.

error: Content is protected !!