Homeठाणे-मेट्रोबांगलादेशी घुसखोरांविरोधात ; कोपरी पोलिसांकडून बांधकाम मजूर, फेरीवाले आदींची ओळखपरेड

बांगलादेशी घुसखोरांविरोधात ; कोपरी पोलिसांकडून बांधकाम मजूर, फेरीवाले आदींची ओळखपरेड

ठाणे :- मागील काही दिवसांपासून घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरील कारवाईचे सत्र सातत्याने सुरू असताना, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोपरी पोलिसांनी ओळख परेड सुरू केली. हॉटेल, बांधकाम, फेरीवाले आदी एकूण १५ अस्थापनात शोध मोहीम घेऊन तब्बल २२५ संशयित व्यक्तींची ओळखपरेड पूर्ण केली आहे.
अभिनेता सैफअली खान यांच्या घरात घुसून हल्ला करणारा तरुण हा बांगलादेशी असल्याचे निष्पन्न आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अनधिकृत प्रवेश करून बांगला देशी नागरिक भारताच्या मोठ्या शहराबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करून राहत आहे. त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर, हॉटेल, फेरीवाले, फळभाज्या, मटण विक्रेते आदी ठिकाणी अचानक भेट देऊन बांगला देशी नागरिकांची पोलीस तपासणी करत आहेत. आतापर्यंत १४ आस्थापन आणि इतर ठिकाणी २२५ नागरिकांची कागदपत्रे तपासली आहेत. पोलीस प्रशासन याद्वारे आवाहन केले जाते की, बांगलादेशी घुखोराबाबत कोणाकडे माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबई ठाण्यात छोट्या-मोठ्या कामांसाठी स्वस्तात दुसऱ्या राज्यातील मजूर उपलब्ध होतो. त्यामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्राबाहेरील नागरिक रोजगारासाठी आपल्याकडे दिसतात. मात्र याच गोष्टीचा फायदा बांगला देशी घुसखोर घेत आहेत. ठिकठिकाणी बांगलादेशी नागरिक आढळून येत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने आमच्या हद्दीतील संशयास्पद वाटणाऱ्या जागेत बांगला देशी घुस खोरांची शोध मोहीम सुरू ठेवली आहे. – निशिकांत विश्वकार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे )

error: Content is protected !!