दिवा:-दिवा भाजपचे रोशन भगत व महिला मंडळ अध्यक्ष सपना भगत यांच्या वतीने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अवधूत हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (भ.वि.आ) शिवाजी आव्हाड,मंडळ अध्यक्ष सचिन भोईर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जवळजवळ दिवा शहरातील शंभरच्या आसपास मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.शिवरायांचा इतिहास जागृत करण्याचे महत्त्वाचे काम या माध्यमातून या मंडळांनी केले. त्यांचा सन्मान व्हावा म्हणून महिला मोर्चाच्या वतिने गेले पाच वर्षे किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जाते अशी भावना महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुळे, भाजपा ठाणे जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर,विनोद भगत,विजय भोईर,सतीश केळशीकर, दिलीप भोईर,अंकुश मढवी,समीर चव्हाण,मधुकर पाटील,प्रविण पाटील, जिलाजित तिवारी,अशोक गुप्ता ,सुरज पानसरे, अजित सातपुते उपस्थित होते. अनेक मान्यवरांच्या वतीने बक्षीस वितरण व सन्मानचिन्ह देऊन सर्व मंडळाचा सत्कार करण्यात आला.दिवा शहरातील शिवजयंती साजरी करणारी मंडळे, व सामाजिक संस्थांतील अनेक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवबा राजे प्रतिष्ठान बेडेकर नगर (पावनखिंड), द्वितीय क्रमांक:-एकविरा ग्रुप साबेगाव (मल्हारगड), तृतीय क्रमांक तिसाई कृपा चाळ वेल्फेअर सोसायटी गणेश पाडा (पुरंदर) , चौथा क्रमांक;-श्रीकृष्ण मित्र मंडळ साईबाबा मंदिर आगासन रोड (राजगड) व पाचवा क्रमांक शिवप्रतिष्ठान(पावनखिंड) दिवा पश्चिम एन आर नगर व शिवप्रेरणा ग्रुप (पद्मदुर्ग ) या मंडळांना विभागून देण्यात आला तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रकाश पाटील आणि विठ्ठल गावडे व सहकारी यांनी काम पाहिले.