दिवा:-भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
भाजपा दिवा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त युवा रोजगार मेळावा , मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि असंघटित कामगार कार्ड वाटप ,जेष्ठ नागरिक कार्ड वाटप, अधिवास प्रमाणपत्र (domicile) वाटप असे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.नागरिकांनी मोठ्या संख्येन उपस्थिती राहून या उपक्रमांचा लाभ घेऊन सौ सपना भगत यांना शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाला भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर , गणेश भगत, धर्मेंद्र शेलार ,नितीन कोरगांवकर, रवि मुणंनकर ,विठ्ठल गावडे,सतिश केळशीकर,जयदिप भोईर ,समीर चव्हाण , किरण कोरगांवकर,अशोक गुप्ता ,राहुल साहू ,गौरीशंकर पटवा ,जिलाजीत तिवारी,प्रफुल साळवी , उदय सावंत , स्वप्नील धुमाळ ,पंकज सिंग,विरेंद्र गुप्ता,विशाल गुप्ता,महिला मोर्चातील सौ सपना भगत यांच्या सर्व सहकारी आणि दिवा भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.