दिवा: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीनजी नबीन यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार, ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत ठाणे शहरातील भाजपा दिवा-शील मंडळाचा दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कोकण पदवीधर आमदार श्री. निरंजनजी डावखरे आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीपजी लेले यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-शील रोड येथील पार्वती हाईट्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुभाषजी भोईर आणि ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस डॉ. राजेशजी मढवी यांच्या हस्ते भारत मातेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाले. संपूर्ण वंदे मातरम आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणाच्या ठिकाणी असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन परीक्षित धमे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात प्रभाग क्र. २९ च्या भाजप नगरसेविका वेदिका साहिल पाटील, जिल्हा व मंडळ कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि शक्तीकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवसांच्या या सत्रात विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी डॉ. ताराचंद पवार यांनी सरकारी योजना, गौरव सिंग यांनी वैचारिक अधिष्ठान, तर श्रीकांत दुबे यांनी बूथ व्यवस्थापन या विषयांवर प्रकाश टाकला. दुसऱ्या दिवशीची सुरुवात प्रार्थना आणि वर्गगीताने झाली, ज्यामध्ये शैलेशजी मिश्रा यांनी कार्यपद्धती, श्री. बाळा केंद्रेजी यांनी इतिहास आणि विकास, परीक्षितजी धमे यांनी सोशल मीडिया आणि AI, तर राजेशजी जाधव यांनी संघटनात्मक कार्यपद्धती या विषयांवर प्रशिक्षण दिले.
या संपूर्ण प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख म्हणून मंडल अध्यक्ष श्री. सचिन रमेश भोईर यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच श्री. साहिल बाळाराम पाटील, श्री. समीरजी चव्हाण, सपना भगत आणि वर्षा काळे यांनी संयोजक व सहसंयोजक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासोबतच जिया भानुशाली, सतीश केळशीकर, अंकुश मढवी, गौरीशंकररा पाटवा, रवी मुननकर, रामानंद गुप्ता, विठ्ठल गावडे, सुयोग राणे, पूनम सिंग आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदविला. शेवटी सामूहिक राष्ट्रगीत आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित करण्यात आले.






