Homeशहर परिसरभारतीय जनता पार्टीच्या दिवा- शहर आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला...

भारतीय जनता पार्टीच्या दिवा- शहर आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिना निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

दिवा:- दिवा शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत यांच्या वतीने आधार कार्ड शिबिर व मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंब्रादेवी कॉलनीतील रोशन भगत यांचे कार्यालयात येथे नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड बायोमेट्रिक, पत्ता बदलणे, नावात बदल, आधार कार्ड अपडेट,, नवीन मतदान नोंदणी, आयुष्यमान स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात दिव्यातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. सदर शिबिराचे आयोजन सपना भगत, रोशन भगत यांनी केले होते .
यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, दत्ता माळकर, बिंदू दुबे, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य जिलाजित तिवारी,
ठाणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस, दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, मधुकर पाटील, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अशोक गुप्ता, व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, गौरीशंकर पटवा, रामबाबू सोनी, अजित केदारे, विठ्ठल गावडे, नितीन कोरगावकर, गणेश सावंत, सुरज पानसरे, अजित सातपुते, अंकित गुप्ता, मंगल राणे, यांच्यासह पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!