Homeकोकण-महाराष्ट्रमनविसेनेची जम्बो कार्यकारणी जाहीर

मनविसेनेची जम्बो कार्यकारणी जाहीर

ठाणे : शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसे देखील ठाण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यामुळेच मागील काही महिन्यात मनसेने ठाण्यात पुन्हा आपली ताकद वाढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातही शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी देखील मनसेने व्युव्हरचना आखत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची नवीन जम्बो कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता आणि मतदानात तरुणांचा वाढता टक्का लक्षात मनसेने देखील यावर अधिक भर देत, ७६ जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे.
     महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रसाठी ठाणे शहर सचिव पदी दिपक शिंदे, उपशहर अध्यक्ष संकेत देवे, विभाग अध्यक्ष महेश घाडगे, विभाग सचिव अनिकेत शिंगोटे, उपविभाग अध्यक्ष निखील कान्हेरे आदींसह कोपरी पाचपाखाडी, वागळे प्रभाग समिती, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती, ठाणे शहर, माजिवडा – मानपाडा, उथळसर, वर्तकनगर आदींसह इतर प्रभागात विविध तरुण तरुणींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात उपविभाग अध्यक्ष – २४, उपविभाग सचिव – ३३, शहर सचिव – २ आदींसह इतर महत्वाच्या नियुक्त्या धरुन तब्बल ७६ जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी मुंबईत अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मनविसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचांगे, निलेश वैती आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!