Homeठाणे-मेट्रोमनसेचे प्रकाश पाटील यांनी दिवा डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाडीची हवा काढली...

मनसेचे प्रकाश पाटील यांनी दिवा डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाडीची हवा काढली व हेडलाईट फोडले

पुन्हा कचरा टाकल्यास तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा

दिवा:- दिवा शहरातील डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याची घोषणा झाली.मात्र अधून मधून या ठिकाणी महापालिकेच्या कचरा गाड्यातून कचरा टाकला जात असल्याचे प्रकार घडत असून याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी जोरदार विरोध केला आहे. गुरुवारी दिवा डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या प्रकाश पाटील यांनी अडवून सदर कचऱ्याच्या गाड्यांची हवा काढली व एका कचऱ्याच्या गाडीचा हेडलाईट फोडून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मनसेच्या एकंदरीत आक्रमक भूमिकेमुळे दिवा डंपिंग प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्ह या निमित्ताने निर्माण झाली आहेत.

दिवा डंपिंग ग्राउंड बंद झालेले असतानाही या ठिकाणी डायघर डम्पिंग येथील व ठाणे शहरातील कचरा आणून टाकला जात असल्याचा आरोप मनसेचे प्रकाश पाटील यांनी केला आहे. दिवा डम्पिंग ला मागील अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांनी विरोध केल्याने अखेर हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले होते.मात्र मागील काही दिवसांपासून छुप्या मार्गाने येथे कचरा डंप होत असल्याचा आरोप मनसेचे प्रकाश पाटील यांनी केला आहे. कचरा टाकण्यासाठी आलेल्या कचऱ्याच्या गाड्या अडवून मनसेचे प्रकाश पाटील यांनी सदर कचरा गाड्यांचे टायर पंचर केले व 15 तारखेनंतर या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी महापालिकेच्या गाड्या आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला आहे.

error: Content is protected !!