Homeशहर परिसरमनसेने दिवा प्रभाग समिती समोर टाकला कचरा,नालेसफाई न झाल्याचा आरोप

मनसेने दिवा प्रभाग समिती समोर टाकला कचरा,नालेसफाई न झाल्याचा आरोप

दिवा:- शहरातील गटारांची आणि नाल्यांची साफसफाई करण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेचा स्वच्छता विभाग डोळे बंद करून बसला आहे.

नाल्यांची आणि गटारांची साफसफाई न झाल्यास प्रभाग समिती समोर कचरा आणून टाकू असा इशारा दिवा मनसे कडून देण्यात आला होता. त्यानुसार आज मनसेने प्रभाग समिती समोर कचरा आणून टाकला. आज पालिका अधिकारी प्रभाग समिती मध्ये उपस्थित नव्हते. जर उद्या पासून नाल्यांची आणि गटारांची सफाई सुरू झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये कचरा आणून टाकू असा इशारा मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दिला आहे.

error: Content is protected !!