Homeकोकण-महाराष्ट्रमनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ दिव्यातील मराठा समाज एकवटला!

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ दिव्यातील मराठा समाज एकवटला!

दिवा:- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ आमरण उपोषणला पाठींबा देण्यासाठी दिवा शहरातील अनेक मराठा बांधव, महिला मोठ्या संख्येने हजर राहिले.

मराठा योद्धा जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असतानाच मराठा आरक्षण विरोधी सर्व मराठा आमदार ,खासदार ,मंत्री यांच्या नावाने समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ,त्यांच्या नावाने बोंब मारून आक्रोश आंदोलन करण्यात आले.शहरात आक्रोश मोर्चा काढुन अनेक बांधवांनी दातीवली गणेश तलाव येथे जाऊन रितसर मुंडन करून मराठा विरोधी आमदारांचे श्राद्ध घातले. मराठा मोर्चाला शहरातील अनेक बहुजन बांधवांनी साथ दिली.सर्वसामान्य बहुजन बांधवांचा ज्याप्रमाणे ग्रामीण भागात पाठींबा आहे तसा शहरी भागात सुद्धा पाठींबा आहे.फक्त राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी जाती जातीत तेढ निर्माण करतात हे यावरून सर्व समाजाला समजले आहे,त्यामुळे यावर मराठा नेत्यांनी आता समाजाची फसवणूक बंद करा अशी भावना अनेक बांधवांनी व्यक्त केली.मराठा आंदोलन लढा जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत चालूच रहाणार अशी शपथ मराठा बांधवानी घेतली.

error: Content is protected !!