Homeशहर परिसरमहापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेचे शिवसैनिकांकडून स्वागत, शिवसैनिक अधिक जोमाने काम करतील-ज्योती...

महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेचे शिवसैनिकांकडून स्वागत, शिवसैनिक अधिक जोमाने काम करतील-ज्योती पाटील

दिवा:- मुंबई सह ठाणे,पुणे, नागपूर व अन्य महापालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यांच्या या निर्णयाचे स्वागत शिवसैनिक म्हणून दिवा शहर शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका ज्योती पाटील यांनी केले आहे. शिवसैनिकांच्या भावना याच प्रकारच्या असल्याचे मत ज्योती पाटील यांनी व्यक्त केले आहे.

याबाबतची पोस्ट ज्योती पाटील यांनी सोशल मीडियावर केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना समजून घेणारा असल्याचेही ज्योती पाटील यांनी म्हटले आहे. याबाबत बोलताना ज्योती पाटील यांनी म्हटले आहे की,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई लढत आहे. माननीय नेते संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगामी मुंबई, ठाणे महापालिका सह राज्यातील सर्व महापालिका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली. शिवसैनिकांच्या मनातील भावना याच असून शिवसैनिक या निर्णयामुळे अधिक जोमाने कामाला लागतील असे ज्योती पाटील म्हणाल्या आहेत.

error: Content is protected !!