Homeकोकण-महाराष्ट्रमालगाडी अपघातामुळे कोकण मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे हाल,तर दिव्यात रेलरोको मुळे लोकल प्रवाशांचे...

मालगाडी अपघातामुळे कोकण मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे हाल,तर दिव्यात रेलरोको मुळे लोकल प्रवाशांचे हाल

एक तासानंतर मध्य रेल्वेची लोकलसेवा पूर्ववत

दिवा:– शनिवारी सायंकाळी कळंबोली येथे घसरलेली मालगाडी वेळेत न हटवल्याने कोकण मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले,तर दिव्यात रेलरोको मुळे लोकल प्रवाशांचे हाल झाले.


तब्बल एक तास लोकल सेवा बंद राहिल्यानंतर दहा वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावरील जलद व धीम्या गतीच्या लोकल सेवा पूर्ववत झाल्या.या मार्गावरील मेल एक्सप्रेस ही सुरू झाल्याची माहिती दिवा स्टेशनचे स्टेशन मास्तर मनोज कुमार गुप्ता यांनी दिली.

कोकणात जाणाऱ्या मेल एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिवा स्टेशन येथे गाडी आठ तासाहून अधिक काळ थांबल्याने कोकण रेल्वे मार्गाच्या पटरीवरून लोकल मार्गाच्या पट्टीवर येत रेल रोको केल्याची माहिती मनोज गुप्ता यांनी दिली. प्रवाशांना कल्याण मार्गे पुढील प्रवास करण्याचा सिग्नल दिला असतानाही प्रवासी पनवेल मार्गे प्रवास करण्याच्या मागणीवर ठाम राहिले.त्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी लोकल रेल्वे सेवा ठप्प केली. मालगाडी कळंबोली येथे घसरल्यानंतर ती हटवण्यात बारा तासानंतर ही यश न आल्याने रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला.माल गाडी न हटवल्याने मेल गाडीतील प्रवाशांचे हाल झाले तर रेल रोको मुळे प्रवाशांचे हाल झाले.

error: Content is protected !!