Homeठाणे-मेट्रोमुंबई- नाशिक महामार्गावरील अपघातात कारचा चक्काचूरा ; पाच जण बचावले

मुंबई- नाशिक महामार्गावरील अपघातात कारचा चक्काचूरा ; पाच जण बचावले

ठाणे:- मुंबई – नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने निघालेल्या एका रेतीच्या डंपरने पुढे असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूरा झाला असून नशीब बळवंत म्हणून त्या कारच्या चालकासह पाच जण बचावले. ही घटना रविवारी सकाळी सव्वा सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉलजवळ घडली. या अपघातामुळे नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
कार चालक आणि मालक विशाल मिश्रा हे रविवारी सकाळी कारने आपल्या चार मित्रमंडळींसह मुलुंड येथून कसारा येथे निघाला होता. त्यांची कार मुंबई नाशिक महामार्गावरील विवियाना मॉलजवळ आल्यावर भरधाव वेगाने मुलुंड कडून कल्याणकडे रेती घेऊन निघालेल्या डंपरने जोरदार धडक दिली. याअपघातात कार रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन जोरात धडकल्याने या अपघातात कारचा चक्काचूरा झाला. सुदैवाने या अपघातात कार मधून चाललेल्या चालक आणि चार प्रवासी असे पाच जण बचावले आहेत. तसेच घटनेनंतर घटनास्थळावरून चार जण निघून गेले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि वाहतूक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली. तसेच या अपघाताने घटनास्थळावरील रस्त्यावरती पडलेले डिव्हायडरचे रॅबिट आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व घनकचरा विभागाचे कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या एका बाजूला केले. याशिवाय अपघातग्रस्त दोन्ही वाहनेही रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर मुंबई कडून नाशिक कडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास सुरू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!