Homeठाणे-मेट्रोमुंब्रा येथून मोबाईल चोरटा अटक; १० गुन्ह्यांची कबुली, ११३ मोबाईल जप्त

मुंब्रा येथून मोबाईल चोरटा अटक; १० गुन्ह्यांची कबुली, ११३ मोबाईल जप्त

ठाणे :- ठाणे शहर पोलिसांनी मुंब्रा परिसरातून सज्जाउद्दीन मोहम्मद मारूफ खैयाद उर्फ गुड्डू (३६) या मोबाईल चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून १० चोरीच्या गुन्ह्यांची कबुली घेण्यात आली असून, १० मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या मदतीने पोलिसांनी इतर १०३ मोबाईल फोन देखील हस्तगत केले आहेत. अशा प्रकारे, एकूण ११३ मोबाईल फोन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे, ज्यांची एकूण किंमत १५ लाख ७५ हजार ५०० रुपये आहे.
तपास आणि अटक
भिवंडी येथील भोईवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करताना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पाटील यांच्या पथकाने मुंब्रा परिसरात समांतर तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंब्रा येथील राजनोली बायपास येथे सज्जाउद्दीन खैयाद उर्फ गुड्डू याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान, त्याने १० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले १० मोबाईल फोन जप्त केले, ज्यांची किंमत १ लाख १३ हजार ५०० रुपये आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सीईआयआर पोर्टलच्या मदतीने मोठी कारवाई
या कारवाईदरम्यान, पोलिसांनी सीईआयआर (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर केला. भिवंडी घटक २ ने ४०, कल्याण घटक ३ ने ४७ आणि उल्हासनगर घटक-४ ने १५ असे एकूण १०२ मोबाईल फोन हस्तगत केले. या सर्व मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे १५ लाख ७५ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या कारवाईमुळे अनेक मोबाईल चोरीच्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे.

error: Content is protected !!