Homeठाणे-मेट्रोमुंब्र्यात कचरा पेटला

मुंब्र्यात कचरा पेटला

ठामपा मुख्यालयात कचरा टाकण्यास निघालेल्या शानू पठाण यांना पोलिसांनी अडविले

ठाणे :- मुंब्रा , कौसा येथील कचरासमस्येने आता उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचर्याने भरलेल्या पाच गाड्या थेट ठाणे महानगर पालिका मुख्यालयाच्या दिशेने वळविल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतले.

गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करण्यात ठाणे पालिकेला यश येत नसल्याने येथील कचराच उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील कचरा उचलावा, यासाठी अनेकवेळा संबधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाण यांनी नाक्यानाक्यावर कचरा भरून गाड्या ठामपाच्या दिशेने वळविल्या. या गाड्या ते ठामपा मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते. कौसा, अमृत नगर, रशीद कंपाउंड आदी भागातील कचरा त्यांनी मुख्यालयासमोर फेकण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी गाड्या अडवून त्यांना ताब्यात घेतले.

error: Content is protected !!