Homeठाणे-मेट्रोमुंब्र्यात भाजपला खिंडार ;सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

मुंब्र्यात भाजपला खिंडार ;सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

ठाणे :- राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या समतावादी विचारधारेवर विश्वास ठेवून मुंब्रा येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या सर्वांना डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थित होते. कळवा – मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्या पुढाकाराने पक्षाच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.

एकीकडे सत्तेच्या वळचणीला जाण्याची स्पर्धा लागलेली असतानाच निष्ठा आणि विचारधारा या तत्त्वांना महत्व देत असल्याचे सांगत भाजपचे ठाणे सरचिटणीस सोहेल जुल्फीकार, कौसा ब्लॉक सरचिटणीस अश्रफ मुकादम, मुंब्रा – कळवा विधानसभा सरचिटणीस कनिझ फातिमा, कौसा ब्लॉक उपाध्यक्ष हाजरा कुरेशी, कौसा ब्लॉक उपाध्यक्ष फरत खान, कौसा ब्लॉक उपाध्यक्ष दानिश शम्सी, कौसा ब्लॉक उपाध्यक्ष खालिद शेख, कौसा ब्लॉक उपाध्यक्ष अफरत सारंग, अफझल शेख, शाहीद पटेल, हमीद सय्यद, अफनान गझाली, रियान गझाली, शहाबाज खान, मोहम्मद नूर शेख या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या सर्वांना डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश दिला.

सध्या देशात द्वेषाचे बीज रोवले जात आहे. अशात खऱ्याअर्थाने समतावादी विचारांची पेरणी डाॅ.जितेंद्र आव्हाड हे करीत आहेत. दलित, शोषित, अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड हे लढत असल्यानेच भाजपमधील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यापुढे सेक्युलर विचारधारेवर विश्वास ठेवणारे हजारो लोक राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत, असे मुंब्रा – कळवा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांनी सांगितले.
या प्रसंगी अल्पसंख्यांक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मुश्रीफ, जावेद मेडिकल, शोएब खान, रेहान पितलवाला, इमरान सुरमे कमरुल हुदा शेख, इनायत बैंग, साजिद अंसारी, इम्तियाज खान, युनूस इकबाल शेख, जफर सय्यद, जावेद सि‌द्धिकी श्रीम. नूर अहमदी चौधरी, बबलू शेमना, जावेद शेख, गणेश मुंढे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!